येशूचे कफन / Poem in Marathi Language by Sudhakar Gaidhani

 
Poem in Marathi Language by Sudhakar Gaidhani
 
 
येशूचे कफन
 
मी निबो पर्वतावर एकांतात
चिंध्या चिंध्या झालेले
वस्र शिवत बसलो
तेवढ्यात प्रभू माझ्या पुढ्यात पाहून
मी दुःखी झ-यासारखा हसलो
” लेकरा हे काय करतोयस तू इथे ?
क्रूसावरचे माझे रक्तही
तू याच वस्राने पुसले तिथे !”
” प्रभू,जोवर हा सूर्य
क्षितिजामध्ये निवत आहे
तोवर मी हे पवित्र वस्र
क्रूसाच्या खिळ्याची सूई करून शिवत आहे “
पृथ्वी थरथर कापू लागली
जीवसृष्टी भयाने पळत धापू लागली
एवढया भंयकर यातना देत नादानांनी
तुमच्या देहावरचे हे एकुलते वस्रही
ओरपून फेकले रस्त्यावर सैतानांनी
ते अवघे होते
तुमच्या पवित्र रक्ताने माखले
ते मी लगेच होते उचलून घेतले
आणि माझ्या आसवांनी कसेबसे धुतले
तेच मी इथे जीव ओतून शिवत आहे
हृदयाच्या धाग्यांनी
क्रोधाने कागद फाडून फेकावा तसे
तुकडे करून फेकले अभाग्यांनी
” बेटा,हे तू कोठवर शिवशील ?
आणि शिवल्यावर
त्याचे काय करशील ?
” प्रभो,हे महावस्र
करुणेचे ‘सपन’ आहे
हे शिवून झाले पहा
हेच तर तुमचे कफन आहे “
– सुधाकर गायधनी
 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s